नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त बदलण्याची शिवसैनिकांची मागणी

Foto
पैठण, (प्रतिनिधी): श्री संत एकनाथ महाराज संस्थांन चे कार्यकारी विश्वस्त बदलण्याची मागणी संत नगर परिसरातील भाविक नागरिक तसेच शिवसैनिकांची केली आहे.
श्री संत एकनाथ महाराज कार्यकारी विश्वस्ताचे अध्यक्ष तत्कालीन पालकमंत्री संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले असल्याने त्यांच्या जागी आमदार विलास भुमरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नऊ वर्षांपासून कार्यकारी विश्वस्त बदलले नाही. 

यापूर्वी कार्यकारी विश्वस्त असलेले नंदलाल लाहोटी यांनी या परिसरातील व्यापारी यांना शिस्त लावली होती. कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ दिले नव्हते. परंतु त्यांच्या जागी निवडण्यात आलेले दादा बारे हे निष्क्रिय ठरले आहेत. त्यांच्या नऊ वर्षाच्या कालावधीत व्यापारी वर्गात कोणतीही शिस्त राहिली नाही. नाथ मंदिर परिसरातच भाविकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. भाविकांच्या पादत्राणे चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहे. 

नाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. बाहेरून आलेल्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वारकरी भावात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशा निष्क्रिय कार्यकारी विश्वस्ताची उचल बांगडी कडून या ठिकाणी नवीन कार्यकारी विश्वस्त नेमण्यात यावा, अशी मागणी वारकरी, भाविक, संत नगर प्रभागातील नागरिक तसेच शिवसैनिकांनी केली आहे.